Wednesday, November 6, 2024

The Only Tether Left to Yesterday…


It was like two shores separated by the river of life. 

His shore was tangled with the clutter of technology, science, equations, and rules, while hers flourished, untamed yet graceful—lush with greenery, delicate flowers, poetry, sculptures, and a perpetual, whispering melody drifting through the breeze. His shy, reserved, and introverted nature made him look at her shore with admiration; she radiated confidence and openness, effortlessly connecting with everyone and everything around her. 

From his shore, he would gaze across the river, drawn to her world, not knowing whether he wished to be a friend, a lover, or simply a silent admirer. He had woven an invisible yet enduring bond, a one-way connection between their two worlds, stealing glimpses of her shore, quietly traveling in tiny boats of social media. Whenever he neared her side, a profound sense of fulfillment filled him, as though he could spend a lifetime basking in her essence. 

Over the years, he transformed his own shore, inspired by hers—it became a place of songs, poems, and sculptures, each created with love for her. He sent flowers and bouquets of songs drifting her way, but no response ever returned. She never acknowledged his presence or the devotion he carried. As time passed, the distance between the two shores grew wider. In desperation, he made countless efforts, hoping to bridge the gap, expressing his feelings quietly, persistently, and sometimes even openly and intensely. In the middle of the river lay a small shoal, a tiny plant of hope that he watched and nurtured, longing for it to bridge their worlds. 

Years of waiting brought both anticipation and despair. Then, one day, a beckoning sound floated from her shore, stirring a new hope in him. He built a boat adorned with his finest flowers and prepared to cross, eager to glimpse her world once more. But as he approached, he found her shore in disarray—the statues broken, flowers scattered, a solemn silence in the air. He called her name, but there was no answer. Navigating his boat through a dense thicket, he finally saw her, standing alone, clutching a shattered statue of Buddha in her hands. 

In that hidden space, he stumbled upon the truth of her heart - a secret she had kept close, guarded in silence. Since her teenage years, she had harbored a complicated story of her own. The Buddha statue was a symbol of this love, a dream so deep it had consumed her, blinding her to reality around her. Her world had always revolved around her dream, as intense and unrequited as his own feelings had been. His own years of longing seemed small in comparison to her decades-long love.

He watched her, wanting to reach out, to offer solace, but her unresponsiveness and ignorance caused him great pain. He realized, painfully, that the beckoning sound was not for him. He had always known he was never a part of her dreams, but what was even more disheartening was that he could never really be part of her reality; probably, he had never existed in her world.

Quietly, he withdrew to his shore, leaving behind his boat on her shore, filled with a carpet of red and white roses. As an introvert, he felt that solitude was perhaps the only balm for such wounds, a way to process and reflect. He hoped time would heal her wounds, that one day she might return to her shore with a smile. He hoped she would walk the carpet he left behind, if she ever wished to, or at least pick white roses to acknowledge his existence. Yet, before that day came, a fierce wave—a tsunami—swept down the river, engulfing everything: the shoal, the withered plant, the boat, his shore, and hers. He saw her cast away the broken Buddha statue, surrendering it to the torrent before she herself embraced the flood, merging into the arms of a new and unknown figure.

Left devastated, he found his beliefs and understanding of her shattered, leaving him adrift, questioning whether he had ever truly known her. Still, he gathered what remained of his heart and built a final, beautiful garden on his shore—a garden meant for her, in case she ever came to visit and saw his love laid bare. A garden woven with poems of all the emotions he experienced. A garden that would be his only tether left to yesterday. 

With that, he left the shore, and boats, leaving the river to flow on, carrying their stories with it...

-------------------------------------------------------------------------------------- 

Decades had passed. He had built his own life, forging new paths and finding his share of happiness. The lingering ache of unresolved questions remained, and the need for closure would occasionally resurface, but he had, for the most part, moved on. Yet, in the quiet corners of his mind, he held on to that distant hope—an unspoken longing to know if she had ever visited the garden of poems he had built for her. This garden on his shore, filled with verses and memories, was his last tie to that old chapter. He would occasionally wander through it, searching for any sign that she might have come, some small acknowledgment of his love, a gesture that might finally offer the closure he sought. 

For so many years, it seemed she had never visited. There was no sign, no faint impression of her footsteps, nothing to suggest she had even remembered the garden still stood there, untouched by time but weathered by longing. He wondered if she had ever thought to look back at the place they had once shared across the river’s divide. Had she, in fact, abandoned not only his shore but her own, swept away by the tidal wave of the past without a single glance behind? 

-------------------------------------------------------------------------------------

Now, after decades of waiting, he found traces—elusive, hazy, almost illusory—suggesting she had visited her shore, even if only briefly. He noticed an image, an echo of her standing where she used to be, lost in thought, gazing toward her Buddha as she once did in her secret sanctuary. But what does it mean? Has she come merely to rekindle memories of her own shore, her own past? Or was there a chance, however faint, that her presence there might hold some connection to his garden? 

All these years, he had watched both shores, and he was certain her shore had been left abandoned all these years, the statues broken, the flowers withered, an untouched landscape of the past including his deserted boat on her shore. But now her image had appeared as if cast from memory onto her shore, startlingly vivid and impossible to ignore. A part of him insisted he couldn’t let it pass unacknowledged. In those faint signs, he sees the possibility of a final answer, a closure he had dreamed of yet never dared to hope for after so long. 

Could her presence signal something he long desired? Has she, perhaps, glimpsed the garden he had kept alive, a shrine to his quiet devotion? Was this a hint that he had, in some way, existed in her memory, even if only as an insignificant part of her past reality? 

A single footstep in his garden, a whisper of her acknowledgment, would mean the world to him—closing chapters of endless questions and gently releasing the last tether…

- नरेन्द्र सिंह [06/11/2024] 

Sunday, January 27, 2008

स्वप्न आणि शब्द!




ती परतीची वाट होती.

एका काळापासून ह्याच वाटेवर पुढे पुढे धावत होतो. नदी-नाल्यांतून, राना-वनांतुन, झुडुपांतून, काट्यांतून मार्ग काढत होतो. मृगजळा मागे पळत होतो. स्वतहालाच छळत होतो. वाटेत काय भेटले नी काय सुटले ह्याचा कधी हिशोब केला नव्हता. पुढे जाताना कधी मागे पाहीले नव्हते. कोणाचे ऐकलेही नव्हते. चूक-बरोबर, चांगले-वाईट, खरं-खोटं... तेव्हां कसलाच विचार केला नव्हता.

वेड्या मनाच्या हाकेला मी ही हात दिला होता आणि डोळ्यांत स्वप्न घेऊन निघालो होतो दूर च्या प्रवासाला. कदाचित कधीच् न संपणारा प्रवास...

दूर कुठे तरी जाऊन अवनी आणि अंबर सुद्धा एकत्र येतात!... त्या क्षितिजा पलिकडे म्हणे कुठलेच अंतर "अंतर" उरत नाही. सगळं विश्वच एकटवतं एकाच ठिकाणी. डोंगर, द़र्या, नदया, सागर, झाडे सगळेच लांब त्या क्षितिजाशी एकत्र जमलेले दिसतात. चंद्र, सुर्य ही तीथेच तर येतात धरेला भेटायला... दररोज... अगदी न चुकता!

तेव्हा मलाही त्या क्षितिजाचीच् ओढ होती. तीथेच मला माझं हरवलेलं विश्व भेटणार होतं... कदाचित!

...................................................................................

पण, आता मात्र ती परतीची वाट होती.

आता डोळ्यांत स्वप्न उरलं नव्हतं. क्षितीजा कडे जाण्याची ओढ नव्हती. कोणत्याही सुखाची आस नव्हती. सतत टोचणाऱ्या आठवणीही नव्हत्या.

गेली कितीतरी वर्षे ह्या वाटेवर धावता-धावता स्वतहालाच हरवून बसलो होतो.
आता मात्र स्वतहाच स्वत:च्या शोधात निघालो होतो.

परतीच्या मार्गावर, एकांत जंगलातून चालता चालता सांज उलटून कधीच काळोख पसरला होता. एकेरी वाटेत पुन्हा सोबतीला फ़क्त चंद्र होता आणि सोबत होता आठवणींचा शीतल वारा. एक एक पाऊल मोजून मापून पडत होते. अशातच्, त्या भयाण शांततेत झुडुपांमागे कसलीशी चाहूल झाली.

थोडं घाबरतच मी त्या दिशेने वळालो. नीटं पाहिलं तसं तीथे बरेचशे लहान लहान जीव दिसले.

काळोख्या अंधारात दबकून बसलेले,
त्या भयाण वातावरणात एकटेच असलेले,
वाटेत कुठे तरी फ़सलेले,
आणी स्वतहाशीच रुसलेले.

कधी ह्याच वाटेत रमलेले,
मग धावता-धावता दमलेले,
शेवटी नशिबा पुढे नमलेले,
आणी एकमेकांच्या सोबतीला एकत्र जमलेले.

... अगदी माझ्या सारखे, माझ्या इतकेच एकटे.

ते गोंडस होते.
ते निरागस होते.
ते शांत होते.
ते अबोल होते.

ते अनेक होते, ते असंख्य होते तरी एकटेच होते.

ते "शब्द" होते !!

काही मायबोलीतले,
काही परप्रांतातले,
काही रोजच्याच व्यव्हारातले,
काही फ़क्त राजाच्या दरबारातले,

काही गंगेसोबत वाहत-वाहत आलेले,
काही समुद्रांपलिकडले पण इथलेच झालेले,
काही इतिहासातून आलेले,
काही इतिहासजमा झालेले,

ते "शब्द" होते.


मी त्यांच्या कडे पाहीले. मोठ्या आशेने तेही माझ्या कडे बघत होते.
आयुष्याच्या जंगलातून एकट्याने प्रवास करुन मी ही आता कंटाळलो होतो. मलाही कुणाची साथ हवी होती. त्या एकाकी जंगलात मला त्यांची आणि त्यांना माझी ’गरज’ होती... कदाचित.

गरज... किती महत्वाची असते ही गरज! 
कुठल्याही नाते-संबंधात ही गरज ’मधे’ नसली की सगळं व्यर्थे! कोणी कोणासाठी कितीही काहीही केले तरी गरज जर दोन्ही बाजूंनी नसली की त्या ’कितीही काहीही’ करण्याला काहीच अर्थ उरत नाही.

आताशा मीही ठरवलं होतं - आता गरजे शिवाय कोणासाठीच काहीच करायचं नाही. गरज असेल तर समोरचा स्वतहून येईल. स्वतहून हात पुढे करेल. कोणी स्वतःहून हात पुढे केल्याशिवाय आपणही पुढाकार घ्यायचा नाही. मग आयुष्य एकटं जगावं लागलं तरीही चालेल.

मी त्यांच्या कडे पून्हा पाहीले, त्यांच्या डोळ्यांत ती "गरज" शोधण्यासाठी. 
त्या सर्वांनीच हात पुढे केलेले होते. त्यांच्या हातात एक अबोल "हाक" होती आणि अनेक वचने होती त्यांच्या त्या निरागस डोळ्यांत.

काही वचने दयायची किंवा घ्यायची नसतात, ती फ़क्त पाळायची असतात. डोळ्यांनीच डोळ्यांना सांगायची असतात आणि खोल कुठेतरी हळुवारपणे जपायची असतात.

अशीच कित्येक वचने मीही कधी कितीतरी वर्षे पाळली होती. काही स्वप्नाशी केलेली वचने तर काही स्वतहाशीच्. खूप खूप जपली होती... अगदी गरज नसतांना सुद्धा!

पण आता मात्र दोन्हीं बाजूनी गरज होती. आशा होती. हाक होती. वचने ही होती... पण तरी... तरी कुठल्याश्या भीतीने माझा हात त्यांच्या कडे जात नव्हता. माझे डोळे त्यांच्या कडे स्थिरावत नव्हते.

कसली भीती?

एखाद्या गोष्टीत स्वतहाला गुंतवून घेणं किती सोपं असतं. पण जेव्हां कधी हा गुंता सोडवायची वेळ येते तेव्हा तो सुटता सुटत नाही. कच्चे धागे-दोरे सुद्धा तेव्हा तुटता तुटत नाहीत. आणी मग हे अर्धवट तुटलेले धागे-दोरे, गुंत्याचे अवशेष छळत रहातात... आयुष्यभर.

वणवा पेटायला एखादाच क्षण पूरेसा असतो पण तो विझता-विझता एक काळ निघून जातो... आणि विझल्यावरही धूराचे, राखेचे निशाण डोळ्यांत टोचतच रहातात ना?

गरज!... पून्हा आलीच मधे ही गरज. आयुष्याच्या एकाकी जंगलात मला त्यांची गरज होती. गरज मोठी असली की भीती सुद्धा कशी लांब पळुन जाते. खरच, किती महत्वाची असते ही "गरज"!

त्या गरजे पायीच मी कळत-नकळत हात पुढे केला. पाणावलेले डोळे मिटले आणि आपल्या सर्वस्वाने त्यांना हाक दिली.

ते ही आले. 

ते पायाशी घुटमळले. ते हातावर झुलले. ते मानेशी लोंबले. ते अंगाशी झोंबले. ते पाठीवर चढले. ते खांद्यावर बसले. ते इवलेशे जीव सर्वस्वाने मला बिलगले !!

ते अनेक स्पर्ष आणि ते क्षण !

माझ्या संपूर्ण शरीरातून विजेचा संचार करवणारे ते क्षण होते.
मला पहील्यांदा प्रेमाचा साक्षातकार घडवणारे ते क्षण होते.
तुटलेल्या स्वप्नाच्या काचांना डोळ्यातच वितळवणारे ते क्षण होते.
हृदयातल्या दुखांना हृदयातच् विरघळवणारे ते क्षण होते.

ते अनेक जीव आणि मी, आता एकजीव झालो होतो.
जणु मी त्यांच्या साठी आणि ते फ़क्त माझ्या साठीच होते...

...................................................................................

आता शब्दच माझे आहेत आणि मी शब्दांचा आहे.
आधी "स्वप्न" होतं, आता "शब्द" आहेत.

दुखां मधे, सुखां मधे,
सणां मधे, वारां मधे,
ग्रीष्मात, थंडीत आणि 
पावसाच्या जलधारां मधे
मी स्वप्नालाच हाक दयायचो
आणि विणून जाळं शब्दांच 
मी स्वप्नालाच बोलवायचो
...पण, स्वप्न कधी माझ्यासाठी आलंच नाही.

काव्यां मधे, गाण्यां मधे,
गजलां मधे, गीतां मधे,
संगीतात, सुरांत आणि 
प्रेमाच्या कवीतां मधे
मी स्वप्नालाच शोधायचो
आणि शब्दांच्या रुपाने
मी स्वप्नालाच मिळवायचो
...पण, स्वप्न कधी माझं झालंच नाही.


स्वप्न माझं, माझ्या डोळ्यांतच राहीलं
स्वप्न माझं, पाणी-पाणी होऊन वाहीलं
आता शब्द डोळ्यांतून हृदयात उतरतात
हृदयात उतरुन जुन्या जखमाही भरतात

स्वप्न माझं, मला पाखरासारखं छळायच
जवळ गेलो की ते लांबच-लांब पळायच
शब्द, बनून फुलं, कधी माझ्यासाठी हसतात
गप्पा मारत निवांत, माझ्यासवे ते बसतात

स्वप्न माझं, नेहेमीच खंत करायचं
माझ्यात उणीवाच का ते नेहेमी शोधायचं
शब्द आता मला सामर्थ्य देतात
माझ्या जीवनालाही ते नवे अर्थ देतात

स्वप्न हसवं होतं पण फ़सवं होतं
सुखाची आस दाखवून नेहेमीच रडवायचं
शब्द शांत आहेत पण सच्चे आहेत
कधी दुखं देऊनही ते मलाच घडवतात

स्वप्नान माझ्या, जाता जाता ही रडवलं
सांगायचं ते काही, आणि भलतंच काही घडवलं
शब्द तेव्हा ही माझ्याच साथी ला होते
रात्र-रात्र जळताना, बनून तेल ते
 वातीला होते

स्वप्न, स्वप्न, स्वप्न, स्वप्न
आधी चोहीकडे स्वप्नच होतं
माझ्या शब्दा-शब्दां मधे स्वप्नच होतं 

...आता स्वप्नातही शब्दच आहेत !


- नरेन्द्र सिंह [२०/०१/२००८]

Saturday, December 15, 2007

फ़क्त एक हाक

आकाशात उडणारे जेव्हां जमीनीवर चालू लागतात
आणी चक्क् माणसांशी बोलू लागतात...

खरं म्हणजे अशात् इतरांनाच आश्च्रर्य व्हावं
ह्यांना धरतीवर बघुन माणसांनीच घाबरावं
पण वर हेच उलट शिमगा करतात
म्हणे, हि माणसं आम्हाला घाबरवतात

आकाशी उडतांना तर सर्वच् जवळ होते
चंद्र, सुर्य, तारे नेहेमीच आटोक्यात होते
मग आता, आकाश सोडुन इथे काय भावलं?
हे पाखरु आज् जमीनीकडे कसं काय धावलं?

म्हणे, सुर्य लांबूनच गुलाबी वाटतो
जवळ जाता नुसताच् जाळतो
तारे आहेत लांबच-लांब रे सारे
चंद्र् ही एकच् आणी कितीतरी झुरणारे

लागली तहान ह्या जीवाला
सोडुन अंबर हा तुजपाशी आला
आता तू तरी ह्यास ह्रदयाशी घेशील का?
स्वप्न नको, मला माझे जीवन देशील का?

मला ही होते स्वप्न ताऱ्यांचेच जेव्हां
आकाशी स्वच्छंद विहरताना तू दिसलीस तेव्हां
तारे सोडुन मग जीव तुझ्यातच् गुंतला
झेप किती घेतली, पण विरहच नशीबी आला

जीवन म्हणतेस ज्याला ते स्वप्न माझे आहे
वर्षे लोटली जगासाठी, मी आजही तीथेच आहे
कधी मागे वळुन, थोडं चालुन एकदा येणार का?
डोळ्यांत डोळे घालुन एक हाक तरी देणार का?

- नरेन्द्र सिंह [१४/१०/२००७]

Saturday, October 27, 2007

सटकते जायें हैं मेरी Team से Developers आहिस्ता आहिस्ता

सटकते जायें हैं मेरी Team से Developers आहिस्ता आहिस्ता
निकलता आ रहा है "और काम" आहिस्ता आहिस्ता

Join होने लगे जब New Trainee तो हमसे कर लिया परदा
यकलख़्त शबाब पर आई "उनकी पगार" आहिस्ता आहिस्ता

हमारे और Trainee बच्चों के काम में बस फ़र्क है इतना
उधर तो है सब जल्दी-जल्दी और इधर हिसाब आहिस्ता आहिस्ता

Bug-Fixing करता जागा हूँ बे T.L. अब तो सोने दे
कभी फ़ुर्सत में कर लेना Rework का हिसाब, आहिस्ता आहिस्ता

वो बेदर्दी से Bug ढुंढें मेरे Coding में और मैं कहूँ उनसे
हुज़ूर आहिस्ता आहिस्ता जनाब आहिस्ता आहिस्ता

- नरेन्द्र सिंह

-----------------------------
Vocabulary:
आहिस्ता आहिस्ता : slowly, slowly
यकलख़्त : at once, instantaneously
शबाब : youth
फ़ुर्सत : leisure, convenience
हिसाब : an account for deeds
बेदर्दी : cruelty
हुज़ूर : Sir
जनाब : His Excellency

-----------------------------
Original Gazal : सरकती जाये है रुख़ से नक़ाब आहिस्ता आहिस्ता
Lyriced By : अमीर मीनाई
Voiced By : जगजीत सिंह, आशा भोसले

Thursday, October 18, 2007

आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर मी स्वप्नांची पतंग उडवतो...

आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो...

स्वप्ने कधी आकशात उंच उडू लागता
वस्तुस्थितीशीही मी पेच् लडवतो ।
वाराही मग वाहतो कधी माझ्या मदतीला
तर कधी कधी तो ही मला रडवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।

स्वप्ने कधी वादळांत सापडता
आशेचा हा कच्चा धागा ही तुटतो ।
संयमाने मग बांधुन गाठी नव्या
मी वादळांवर ही विजय मिळवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।

वाटते काळजी काहींना माझ्या कडे पाहाता,
काहींना येते हसु तर कोणी उगीच् मला छळतो ।
मग माझ्यावर हसणाऱ्यांना मला छळणाऱ्यांना
मी स्वप्नांमधेच् नेऊन जाम् बडवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।

- नरेन्द्र सिंह [१८/१०/२००७]

Tuesday, September 25, 2007

मित्रा, तुझ्याविणा जगताना...

मित्रा, तुझ्याविणा जगताना
आता आम्ही नीट ताट मांडून जेवत नाही
कारण, ते आवरणारा कोणी नसतो
आणि आता "बसणेही" होत नाही
कारण, वेळ आलीच तर सावरणारा कोणी नसतो

मित्रा, तुझ्याविणा जगताना
आता आम्ही रूम बाहेर पडत नाही
आणि जाऊन त्या "पुणेरी" खड्यांना नडत नाही
कारण, वाटेतले रस्ते शोधणारा कोणी नसतो

मित्रा, तुझ्याविणा जगताना
आता मी गजला देखील ऎकत नाही
कारण, मी "पेटवलेल्या" गजलांना दाद देणारा कोणी नसतो
आणि आता त्या गाण्याचा प्रयत्नही करवत नाही
कारण, सोबत साथ देणारा कोणी नसतो...

- नरेन्द्र सिंह

Friday, September 14, 2007

अब मैं Walk-Ins की क़तारों में नज़र आता हूँ

अब मैं Walk-Ins की क़तारों में नज़र आता हूँ
अपने schedule से पिछडने की सज़ा पाता हूँ

इतनी vacancies पर बाज़ार से जब offer लाता हूँ
अपने दोस्तो में package बता के शरमाता हूँ

अपनी interest का job ढुंढने की कोशिश में
भागते-भागते थक जाता हूँ, सो जाता हूँ

कोई fresher समझ के खीँच न ले फिर से कहीँ
मैँ fake-experience ओढ के चुपचाप interview मे जाता हूँ

-----------------------------
Vocabulary:
क़तार = queue
पिछडने = to lag behind, delayed

-----------------------------
Original Gazal : अब मैं राशन की क़तारों में नज़र आता हूँ
Lyriced By : खलील धनतेजवी
Voiced By : जगजीत सिंह