आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो...
स्वप्ने कधी आकशात उंच उडू लागता
वस्तुस्थितीशीही मी पेच् लडवतो ।
वाराही मग वाहतो कधी माझ्या मदतीला
तर कधी कधी तो ही मला रडवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।
स्वप्ने कधी वादळांत सापडता
आशेचा हा कच्चा धागा ही तुटतो ।
संयमाने मग बांधुन गाठी नव्या
मी वादळांवर ही विजय मिळवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।
वाटते काळजी काहींना माझ्या कडे पाहाता,
काहींना येते हसु तर कोणी उगीच् मला छळतो ।
मग माझ्यावर हसणाऱ्यांना मला छळणाऱ्यांना
मी स्वप्नांमधेच् नेऊन जाम् बडवतो ।
आशेच्या ह्या नाजुक धाग्यावर
मी स्वप्नांची पतंग उडवतो ।
- नरेन्द्र सिंह [१८/१०/२००७]
No comments:
Post a Comment