आकाशात उडणारे जेव्हां जमीनीवर चालू लागतात
आणी चक्क् माणसांशी बोलू लागतात...
खरं म्हणजे अशात् इतरांनाच आश्च्रर्य व्हावं
ह्यांना धरतीवर बघुन माणसांनीच घाबरावं
पण वर हेच उलट शिमगा करतात
म्हणे, हि माणसं आम्हाला घाबरवतात
आकाशी उडतांना तर सर्वच् जवळ होते
चंद्र, सुर्य, तारे नेहेमीच आटोक्यात होते
मग आता, आकाश सोडुन इथे काय भावलं?
हे पाखरु आज् जमीनीकडे कसं काय धावलं?
म्हणे, सुर्य लांबूनच गुलाबी वाटतो
जवळ जाता नुसताच् जाळतो
तारे आहेत लांबच-लांब रे सारे
चंद्र् ही एकच् आणी कितीतरी झुरणारे
लागली तहान ह्या जीवाला
सोडुन अंबर हा तुजपाशी आला
आता तू तरी ह्यास ह्रदयाशी घेशील का?
स्वप्न नको, मला माझे जीवन देशील का?
मला ही होते स्वप्न ताऱ्यांचेच जेव्हां
आकाशी स्वच्छंद विहरताना तू दिसलीस तेव्हां
तारे सोडुन मग जीव तुझ्यातच् गुंतला
झेप किती घेतली, पण विरहच नशीबी आला
जीवन म्हणतेस ज्याला ते स्वप्न माझे आहे
वर्षे लोटली जगासाठी, मी आजही तीथेच आहे
कधी मागे वळुन, थोडं चालुन एकदा येणार का?
डोळ्यांत डोळे घालुन एक हाक तरी देणार का?
- नरेन्द्र सिंह [१४/१०/२००७]
No comments:
Post a Comment